नाते हे कोणते – Nate He Konte Lyrics in Marathi – Triple Seat

नाते हे कोणते – Nate He Konte Lyrics in Marathi – Triple Seat

नाते हे कोणते – Nate He Konte Lyrics

बरसते उन्हात चांदणे जणू
बदलती क्षणात हे ऋतू
मला कळेना
कशी हि जादू
कशी कळावी
कोणास सांगू
असे मनातल्या मनातले
भास की खरेच जग म्हणू

नाते हे कोणते
कोणास ना कळाले कधी

गुंतणे वाटे हवे हवे
शोधते आता कुणात
मी स्वतःस का उगाच
हरवूनी मी राहते

आता नभात माझ्या
विखुरले तुझे च रंग हे जणू
आता मनात माझ्या
राहते तुझे च रूप हे जणू
असे मनातल्या मनातले
भास की खरेच जग म्हणू

नाते हे कोणते
कोणास ना कळाले कधी

रंग हे सारे नवे नवे
चालते आता
हि पायवाट जाई जे कुठे
मला हे आता ना कळे

असे मनास वेड्या
लागले तुझे च वेड हे जणू
मला जागवी का
मखमली तुझे च स्वप्न हे जणू
असे मनातल्या मनातले
भास की खरेच जग म्हणू

नाते हे कोणते
कोणास ना कळाले कधी


Thanks:-Abhi




Post a Comment

0 Comments